खानापूर (वार्ता) : खानापूर शहरातील टाऊन पंचायतीच्या मुख्य अधिकारीपदी बाबासाहेब माने यांनी मंगळवारी दि. 11 रोजी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली.
खानापूर टाऊन पंचायतीच्या मुख्य अधिकारी विवेक बन्ने यांची बेळगाव येथे बदली झाली. त्यामुळे खानापूर टाऊन पंचायतीचे मुख्य अधिकारी पद रिक्त होते. त्या पदी बाबासाहेब माने रूजू झाले.
बाबासाहेब माने यांनी यापूर्वी 2018 ते 2020 अशी दोन वर्षे खानापूर टाऊन पंचायतीचे मुख्य अधिकारी म्हणून सेवा बजावली. याच काळात तब्बल 12 वर्षांनी श्रीमहालक्ष्मी यात्रा पार पडली. यावेळी मुख्य अधिकारी बाबासाहेब माने यांनी यात्रा काळात चांगले कार्य पार पाडले.
यात्रा काळात खानापूर शहरात सर्व सोयी उपलब्ध केल्या. त्यामुळे यात्रा पार पाडण्यास सोयीचे झाले.
मुख्य अधिकारी बाबासाहेब माने यांनी यापूर्वी अळणावर टाऊन पंचायत, संकेश्वर नगरपालिका तसेच निपाणी नगरपालिकामध्ये कचेरी व्यवस्थापक म्हणून सेवा बजावली. पुन्हा खानापूर टाऊन पंचायतीच्या मुख्य अधिकारी हजर झाल्याने शहरवासीकडून स्वागत करण्यात आले.
