Thursday , November 21 2024
Breaking News

बेळगाव-पुणे-बेळगाव वंदे भारतसह प्रलंबित रेल्वे प्रकल्पांची पुर्तता करा : खास. जगदीश शेट्टर

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्ली येथील शपथविधी संपल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वे प्रकल्पाच्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. बेळगावमधील प्रलंबित रेल्वे प्रकल्प लवकरात लवकरपूर्ण करून नव्या मागण्याचीही पूर्तता करून देण्यासाठी विनंती करण्यात आली.

केंद्रीय मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत बेळगाव -कित्तूर – धारवाड मार्गासाठी नवीन रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन खास. शेट्टर यांनी केले असून दोन वर्षांपूर्वी भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतरही राज्य सरकारने रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना एकही जमीन हस्तांतरित केलेली नाही.

बेळगाव-कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे प्रकल्प अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांना खासदार शेट्टर यांनी दिली. या प्रकरणाचे पुनरावलोकन करण्याची विनंती करून कर्नाटक राज्य सरकारला प्रकल्पाची जलद अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वे- हुबळीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक जमीन सुपूर्द करण्यासाठी प्रारंभिक पावले उचलण्याचे निर्देश दिले.

विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) आणि राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी (आरसीयु) यासह अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालये आशियातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित केएलई हॉस्पिटल हे बेळगाव शहरात असून बेळगाव शहर शैक्षणिकदृष्ट्या व औद्योगिकदृष्ट्याही प्रगत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये नूतनीकरण केलेल्या नवीन रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या नवीन सुविधा उपलब्ध असून आपल्या मतदारसंघातील रहिवाशांच्या मागणीनुसार विविध मार्गावर नवीन गाड्या सुरू कराव्यात अशी विनंती खासदारांनी केली आहे.

यामध्ये बेळगाव – बेंगळोर-बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस, बेळगाव-पुणे-बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस, बेळगाव-अयोध्या-बेळगाव, बेळगाव-पंढरपूर-बेळगाव, बेळगाव शहरातून केरळला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी हुबळी-कोचीवेली-हुबळी साप्ताहिक एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार, बेळगाव – चेन्नई -बेळगाव दैनिक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन, बेळगाव-वाराणसी-बेळगाव एक्सप्रेस (पंधरा दिवसातून एकदा), बेळगाव-जोधपूर-बेळगाव एक्सप्रेस (पंधरा दिवसातून एकदा) या रेल्वे सेवांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय मंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ब्रेक फेल झाल्याने मुनवळ्ळी-सौंदत्ती येथे अपघात : दोघांचा मृत्यू

Spread the love  सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावाच्या बाहेर क्रूझर वाहनाचे ब्रेक फेल होऊन, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *