बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटच्या २०२४-२५ च्या नवीन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण सोहळा दि. २७ जून २०२४ रोजी बेळगाव फाऊंड्री क्लस्टरच्या सभागृहात पार पडला. माजी जिल्हा गव्हर्नर डॉ. समीर हरियाणी यांच्या हस्ते हा अधिकार ग्रहण सोहळा पार पडला. नूतन कार्यकारिणीत श्री. सचिन हंगिरगेकर यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच सचिवपदी श्री. विशाल मुरकुंबी आणि कोषाध्यक्षपदी श्री. रवी संगोळी यांची निवड करण्यात आली. सुरवातीला मावळते अध्यक्ष श्री. जयकुमार पाटील आणि सचिव श्री. आदर्श मत्तिकोप यांनी २०२३-२४ मध्ये क्लब ने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावर्षीचा सर्वोत्तम रोटेरियन म्हणून श्री. संजीव भोसगी याना पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर नूतन अध्यक्षांनी २०२४-२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा तपशील सांगितला आणि नूतन कार्यकारी मंडळ आणि विविध डायरेक्टरांची ओळख करून दिली. त्यानंतर माजी जिल्हा गव्हर्नर डॉ. समीर हरियाणी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात क्लबने किमान १०० विविध कार्यक्रम आणि उपक्रम करण्याची सूचना नूतन अध्यक्षांना केली. तसेच क्लबच्या सध्या सुरु असलेल्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यानंतर उपस्थितांनी नूतन अध्यक्षांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून बालिका आदर्श विद्यालयाच्या काही विद्यार्थिनींची फी भरण्याचा कार्यक्रम क्लब दरवषी करीत असतो. या ही वर्षी फी चा चेक शाळेच्या प्रतिनिधीना सुपूर्त करण्यात आला. तसेच काही सुतारांना वूड कटर चे वितरण करण्यात आले.त्यानंतर इव्हेंट चेअर श्री. आकाश पाटील यांनी आभार मानले. श्री. पुष्कर ओगले आणि कु. रमणी हंगिरगेकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta