Friday , March 6 2026
Breaking News

गोपाळ जीनगौडा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जाहीर

Spread the love

 

बेळगाव : शिंदोळी येथील गोपाळ जीनगौडा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जाहीर करण्यात आले आहेत.
यंदा विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा मान गोपाळ जीनगौडा शाळेला मिळाला असून नुकत्याच शाळेत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. गोपाल जीनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वांडकर, स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी विद्याभारती राज्य समन्वयक सुजाता दप्तरदार, संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, ओमकार गावडे, मयुरी पिंगट, अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार उपस्थित होते. प्रारंभी मयुरी पिंगट हिने नुकत्याच बिदर येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत झालेल्या बैठकीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या बैठकीत आगामी जिल्हास्तरीय विद्याभारती स्पर्धा विविध ठिकाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 जुलै रोजी अनगोळमधील संत मीराच्या शाळेच्या मैदानावर हँडबॉल स्पर्धा, त्याचदिवशी सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर प्राथमिक मुला मुलींची फुटबॉल स्पर्धा तसेच बुधवार ता 10 जुलै रोजी बुद्धिबळ, योगा, कराटे, शटल बॅडमिंटन स्पर्धा शिंदोळी येथील गोपाळ जीनगौडा शाळेच्या सभागृहात तर अथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, व्हालीबॉल स्पर्धा नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यंदा या स्पर्धेत संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ, संत मीरा इंग्रजी स्कूल गणेशपुर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, सी व्ही रामन स्कूल रामदुर्ग, गोपाळ जीनगौडा स्कूल शिंदोळी या शाळेचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

दागिने लांबवणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील मराठा कॉलनीतील रहिवासी निर्मला मिलिंद सावंत यांनी ४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *