
बेळगाव : बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉक्टर आणि भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपला वाढदिवस आर्ष विद्या मंदिरातील मुली आणि राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सदस्यांसोबत नुकताच आगळ्या पद्धतीने साजरा केला.
वाढदिवसानिमित्त श्री चित्प्रकाशनंद स्वामीजी यांच्या हस्ते नियती फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संस्थापक -अध्यक्ष असलेल्या डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांनी स्वामीजींचा सत्कार केला. आर्ष विद्या मंदिर आश्रमातील मुलींनी आरती करून डॉ. सोनालीला कुमकुम तिलक घातला. त्यानंतर सर्वांच्या इच्छेनुसार केक कापण्याचा सोहळाही पार पडला. याप्रसंगी आर्षच्या मुलींनी श्लोक आणि आध्यात्मिक गीते गायली. यावेळी उपस्थित मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास दीपाली माळकरी, कांचन चौगुले, विद्या सरनोबत, आशाराणी निंबाळकर, नम्रता हुंदरे, नीना काकतकर, किशोर काकडे आदींसह युवा समूह उपस्थित होता. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बेळगाव शहर व खानापूर परिसरातील विविध शाळा व अनाथाश्रमांमध्ये देखील शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वितरण केले गेले.
Belgaum Varta Belgaum Varta