बसवण कुडची येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न
बेळगाव : “शिक्षक हा संस्कारमय पिढी घडवणारा असतो. शालेय जीवनातील विद्यार्थी शिक्षण घेऊन आज समाजामध्ये आपली पत निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या नावासमोर उपाधी धारण करून आपली ओळख निर्माण करावी. चांगलं जीवन जगत असाताना सामाजिक जाणिव ठेवून सर्वांशी ऋणानुबंध रहावे, असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून बोलताना या शाळेचे माजी मुख्याध्यापक व सीमाकवी रवींद्र पाटील यांनी प्रतिपादन केले.
बसवन कुडची येथे 2002 मध्ये दहावीच्या वर्गात शिकलेल्या श्री कलमेश्वर हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला यावेळी अध्यक्षस्थानी सीमाकवी रवींद्र पाटील.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली. यानंतर सर्व माजी शिक्षक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा ऋणानुबंध एक आठवण म्हणुन एकोणीस वर्षानंतर हा स्नेहमेळावा दि. २५ रोजी बसवण कुडची येथे आयोजित करून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळावा मित्र- मैत्रिणी यांच्यात एक संवाद व्हावा व गुरुजन ही आपले या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी हा स्नेहमेळवा घेण्याचा हेतू प्रास्ताविकातून किरण पाटील यांनी विशद केला.
यावेळी उपस्थित शिक्षक रवींद्र पाटील, जोतिबा मुतगेकर, बसवराज दिवटे, पाटोळे सर, क्रीडाशिक्षक बाळाराम जैनोजी, सुजाता दिवटे -अक्षीमणी व तुकाराम वडगावकर या गुरुजनांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
तसेच सर्व मान्यवर गुरुजन यांची ही मार्गदर्शनपर भाषणे झाली.
यावेळी मंदाकिणी मुचंडीकर, सतीश बेडका, सागर सावकार, चंद्रकांत हिंडलगेकर, उमेश दिवटे, रवी हाळबाचे, शीतल दिवटे यानी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सुषमा गिरी, अनिता चौगुले, लक्ष्मण बेडका, जोतिबा जोडगुंजे, विकास बेडका, शिवाजी बेडका, मनोज पाटणेकर, अरुण पालेकर, सुधीर खोकलेकर, सिद्धाप्पा बेडका, मंजुळा लोहार यासह आदी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याला उपस्थित होते.
सुत्रसंचलन मंदाकिणी मुचंडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश बेडका यांनी मानले.