Friday , November 22 2024
Breaking News

जीएसएस महाविद्यालय, राणी पार्वती देवी महाविद्यालय या संस्थांना मिळाले स्वायत्तता स्टेटस

Spread the love

 

बेळगाव : साउथ कोकण एज्युकेशन (एस के ई) सोसायटी संचलित जीएसएस महाविद्यालय व राणी पार्वती देवी महाविद्यालय या दोन्ही संस्थांना स्वायत्तता स्टेटस मिळाले असून या शैक्षणिक वर्षापासून आम्ही अभ्यासक्रम आणि परीक्षा नियोजन स्वतःचीच तयार करीत आहोत” अशी माहिती एस के ई सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस चेअरमन एस वाय प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शुक्रवारी सकाळी संस्थेच्या कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य अभय पाटील यांनी आर पी डी महाविद्यालयाने स्थापनेपासून आतापर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. तर जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य बी एल मजूकर यांनी जीएसएसच्या प्रगतीचा आढावा घेतला.
स्वायत्तता का गरजेची आहे हे सांगताना मजुकर म्हणाले की, “आपल्या देशात 45000 डिग्री महाविद्यालय असून त्यातील फक्त 995 म्हणजे केवळ दोन टक्के महा विद्यालयांना स्वायत्तेची मान्यता आहे. विद्यापीठे पाच वर्षातून एकदा अभ्यासक्रम बदलतात. तर आम्ही बदलत्या परिस्थितीनुसार तीन वर्षातून एकदा आमचा अभ्यासक्रम बदलू शकतो. व नव्या पिढीला होत असलेले बदल देऊ शकतो” असे ते म्हणाले
कॉलेज मॅनेजिंग कमिटीच्या चेअरमन माधुरी शानभाग आणि व्हाईस चेअरमन बिंबा नाडकर्णी यांनीही महत्त्वाची माहिती दिली.
एस वाय प्रभू पुढे म्हणाले की,”आमच्याकडे येणारा विद्यार्थी हा बहुसंख्येने ग्रामीण भागातील आहे. त्या विद्यार्थ्याला स्वबळावर उभा राहता यावे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून फक्त शिकवणे आणि मिळणारे मार्क्स एवढेच महत्त्वाचे नाही तर विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यापेक्षा मोठी असून शिक्षक व पुस्तके याहीपेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतः अधिक ज्ञान संपादन केले पाहिजे ही आमची धारणा आहे” असे ते म्हणाले.
“बेळगाव शहर आणि परिसरात 30 ते 35 वयोगटातील अनेक महिला इच्छा असूनही नोकरीविना आहेत. अशा महिलांसाठी आम्ही तीन ते सहा महिन्याचे छोटे छोटे कोर्सेस सुरू करण्याचा विचार करीत आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. “स्वायत्तता मिळण्यापूर्वी आमच्या महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी वेगवेगळ्या संस्थांना भेटी देऊन त्यांच्यामधील गुण आणि उनिवा यांचा अभ्यास केला. त्यातून आम्ही नवा अभ्यासक्रम तयार केला आहे, जो अभ्यासक्रम मुलांना त्यांच्या जीवनात त्यांना उभा राहण्यासाठी, येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी, जगाची विविध क्षेत्रे पादाक्रांत करण्यासाठी तो तयार व्हायला हवा, त्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होईल याचा मला विश्वास आहे.
एस के ई संस्थेला शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून 80 वर्षे पूर्ण झाली असून सुसज्ज व अत्याधुनिक कार्यशाळांबरोबरच भव्य ग्रंथालय, स्पोर्ट्ससाठी लागणारे इतर साहित्य, बरोबरच मोठे पटांगण, वेगळी स्टेडियम, नवनवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेला प्राध्यापक वर्ग आमच्याकडे आहे” याचा मला अभिमान वाटतो. अशी माहितीही श्री प्रभू यांनी यावेळी दिली. “आम्ही नवनव्या पद्धतीचा अवलंब करीत असल्याने आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली असून नजीकच्या काळात आमच्या दोन्ही महाविद्यालयातील सर्व कोर्सेस हे अधिकाधिक लोकप्रिय होतील असे मला वाटते .”
प्रारंभी इंग्रजी विभागाच्या शरयू पोटनिस यांनी स्वागत केले तर कन्नड विभागाचे प्रमुख डॉ. एच बी कोलकार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *