बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र जीनगौडा शाळेचे सचिव कुंतीसागर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, देवेंद्र जीनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील. संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते क्रिडाध्वजारोहण करण्यात आले. यानंतर ऊकार सरस्वती भारत माता प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. शालेय खेळाडू सम्राट जाधव, चिन्मय मायगोटी, अमोघ, सुरेश, तन्मय यांनी मैदानाभोवती क्रिडाज्योत फिरवून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली खेळाडू पद्मजा जनगौडा हिने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली, यानंतर पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.यानंतर जिल्हास्तरीय अथेलिटीक, कब्बडी, खो खो, व्हॉलीबॉल स्पर्धाना प्रारंभ झाला. याप्रसंगी विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वांडकर, मयुरी पिंगट, यश पाटील, शिवकुमार सुतार, उदयकुमार संकण्णावर, गंगा गाणिकोप्प, श्वेता पाटील, आशा भुजबळ, सागर कोलेकर, अनुराधा पुरी, उपस्थित होते. या स्पर्धेत विद्याभारती संलग्नित शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, संत मीरा स्कूल अनगोळ, संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल गणेशपुर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, हनिवेल स्कूल खानापूर, देवेंद्र जीनगौडा स्कूल शिंदोळी व रामदुर्ग तालुक्यातील शाळेतील 450हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. याप्रसंगी क्रीडाशिक्षक अनुराधा पुरी, उदय संकमण्णावर, गणपत गावडे ,ओमकार गावडे, उमेश पट्टेद, श्वेता पाटील, आशा भुजबळ, यश पाटील, शिवकुमार सुतार, मयुरी पिंगाट, संजु गदीनकेळी, नागराज पाटील, बसवंत पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नायक तर डायना डिसोजा हिने आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta