बेळगाव : सध्या सर्वत्र डेंग्यूने थैमान माजले आहे त्यामुळे त्याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन येथील मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने सुमारे 200 नागरिकांना डेंग्यू लस देण्यात आली.
यंदा मर्कंटाईल या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून या वर्षात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे चेअरमन संजय मोरे, व्हाईस चेअरमन रमेश ओझा, संचालक शारदा सावंत, किशोर भोसले, प्रसन्ना रेवन्नावर, सदाशिव कोळी, राजेंद्र आडुरकर, जयपाल ठकाई, सविता कणबरकर यांच्यासह सर्व शाखा व्यवस्थापक, पिग्मी संकलक व सभासद उपस्थित होते.
हा उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितानी आभार व्यक्त केले. याहीनंतर ज्या कुणाला ही लस घ्यावयाची असेल त्यांनी मर्कंटाईलच्या कोणत्याही शाखेत कामाच्या दिवशी जाऊन लस घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta