Saturday , March 7 2026
Breaking News

गर्भलिंग तपासणी करणाऱ्या हॉस्पिटलवर धाड

Spread the love

 

बेळगाव : पीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग तपासणी करणाऱ्या मूडलगी येथील हॉस्पिटलवर राज्य आरोग्य विभाग प्राधिकरण आणि राज्य तपासणी आणि देखरेख समितीने छापा टाकला.

मूडलगी येथील इक्रा सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ. कुतेझुल्ला कुब्रा हे गर्भ लिंग तपासणी करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तसेच पुढे येत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाशी संबंधित राज्य आरोग्य प्राधिकरण आणि राज्य तपासणी तसेच देखरेख समितीने धाड टाकली.
गर्भलिंग तपासणीसाठी तुकाराम भीमप्पा खोत नावाच्या एजंटकडून आतापर्यंत सुमारे 70 ते 80 गर्भवती महिलांची गर्भलिंग चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 20 जणांना मूडलगी येथील एस.एस. पाटील हॉस्पिटल आणि ममदापूर येथील सिद्धार्थ पुजारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. इक्रा सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये लिंग तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळताच याचा तपास घेत एजंट तुकाराम भीमाप्पा खोत याच्याकडून रोख 1,08,000 रुपये जप्त करण्यात आले. तसेच धाडीदरम्यान फोन पे अकाउंटवर झालेला 20 हजार रुपयांचा व्यवहारही उघडकीस आला आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि एजंटकडून जप्त केलेली रक्कम पुढील तपासासाठी बेळगाव जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *