Monday , December 23 2024
Breaking News

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली जिल्ह्यातील विविध नदीपात्रांची पाहणी

Spread the love

आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना

बेळगाव : शेजारील महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रातील विविध भागांची पाहणी केली.

सूतगट्टीजवळील घटप्रभा नदीच्या पुलाजवळ नदीच्या प्रवाहाचा वेग आणि सध्याची पाण्याची पातळी याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. यानंतर त्यांनी संकेश्वर शहरात जाऊन संभाव्य पुरामुळे बाधित होणाऱ्या भागांची पाहणी केली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मागील पुराच्या वेळी उद्भवलेल्या समस्यांबाबत चर्चा करून संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कांही भागात पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांनी पूल ओलांडू नये यासाठी चेतावणी देणारे फलक आणि बॅरिकेड्स लावावेत.

हुक्केरी तहसीलदार मंजुळा नायक यांनी स्पष्ट केले की, 2019 च्या पूरस्थितीत स्थापन केलेल्या काळजी केंद्रांप्रमाणेच काळजी केंद्रांची यादी आधीच तयार करण्यात आली आहे आणि सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातील.

त्यांनी चिक्कोडी तालुक्यातील मांजरी पुलाजवळ कृष्णा नदीचा प्रवाह पाहिला. त्यानंतर यदुरा गावाजवळील कृष्णा नदीत बोटीतून प्रवास करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत लोक आणि गुरांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.

शेजारील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे आपण नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे.
नदीच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आपत्कालीन कारवाई करण्यासाठी बोटीसह आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यात सध्या पुराचा धोका नाही

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नाही मात्र, सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी 26 बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास कारवारहून जादा बोटी आणल्या जातील, असे त्यांनी सांगितले. चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्यासह महसूल व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *