
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या विश्वजित मोरे आणि धनराज जमनिक या कुस्तीपटूनी एशियन कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये आपली चमक दाखवली. हे दोघेही कुस्तीपटू मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या बॉईज स्पोर्ट्स कंपनीमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. विश्वजित मोरे याने तेवीस वर्षाखालील गटात ग्रीको रोमन कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल पटकावले. ही स्पर्धा जॉर्डन मधील अम्मान येथे झाली होती.
धनराज जमनिक याने थायलंड येथील सिरीराचा येथे झालेल्या एशियन कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये पंधरा वर्षाखालील गटात ग्रिको रोमन कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल मिळवले.
विश्वजित मोरे आणि धनराज जमनिक यांनी एशियन कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी केलेला नियमित सराव घेतलेले अपार कष्ट यामुळे त्यांना यश मिळाले आहे. त्यांना मिळालेल्या यशामध्ये प्रशिक्षकांचे देखील मोलाचे योगदान आहे.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या बॉईज स्पोर्ट्स कंपनीमध्ये देशभरात निवडलेल्या तरुण कुस्तीपटूना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. यातूनच जागतिक पातळीवर चमक दाखवणारे कुस्तीपटू तयार होत आहेत असे प्रशांसोदगार ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांनी काढले.
Belgaum Varta Belgaum Varta