Sunday , July 26 2026
Breaking News

मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

Spread the love

 

आरोपी

बेळगाव : मतिमंद तरुणीवर एका व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बेळगावच्या काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आई -वडील शेताकडे गेल्याचा फायदा घेऊन एका नराधम तरुणाने एका मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कडोली येथे घडली.

दरम्यान त्या मुलीच्या काकाने त्या तरुणाला तात्काळ पकडून मारहाण केली. त्याला मारहाण करताच तो बेशुद्ध पडल्याचे नाटक करून फरारी झाला.

पीडित तरुणीसह आई-वडील, नातेवाईकांनी तात्काळ काकती पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. सतर्कतेनंतर बेळगाव ग्रामीण विभागाच्या पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपीला अटक केली.

डीसीपी स्नेहा यांनी बेळगावातील काकती पोलिस स्टेशनला भेट देऊन नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेतली. कडोली गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *