
बेळगाव : कडोली गावात काल घडलेल्या अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर कडोली ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत गावात अशांतता निर्माण करणाऱ्या कुटुंबाला गावातून हाकलून द्यावे, अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना देण्यात आले.
तत्पूर्वी कडोली ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार स्वेच्छेने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन संताप व्यक्त केला. मतिमंद तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी कडोली येथील ग्रामस्थांनी सांगितले की, सदर तरुण कडोली गावात वारंवार अशांतता निर्माण करत आहे. यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. या आरोपीसह संपूर्ण कुटुंबाला तातडीने गावाबाहेर हाकलून द्यावे. अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा टाळावी.
यावेळी केपीसीसी सदस्य मला
गौडा पाटील म्हणाले की, कडोली गावातील घटनेनंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार पीडित युवती व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला. गावात अशांतता निर्माण करणाऱ्या तरुणांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी आम्ही करत आहोत. या आंदोलनात श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह कडोली गावातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta