बेळगाव : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची मासिक बैठक शनिवारी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हेस्कॉम सहाय्यक कार्यकारी अभियंता उपविभाग 1, बेळगाव यांच्या कार्यालयात होणार आहे.
वीज पुरवठा, बिलिंग व वीज विभागाच्या इतर समस्यांबाबत ग्राहकांना त्यांचे नाव, आरआर क्रमांक, पत्ता व मोबाईल क्रमांकासह लिखित सूचना या बैठकीत देता येतील. हेस्कॉम (एईई) सहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत) सजिव जी हम्मन्नवर यांनी वीजपुरवठ्यात काही अडचणी आल्या तरी त्याद्वारे तक्रारींचे निराकरण करण्यात यावे, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta