बेळगाव : बेळगाव, खानापूर परिसरात सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 34 (एम) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत, सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या आणि पदवीधरपूर्व (12 वी पर्यंत) बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार दिनांक 22 व मंगळवार दि. 23 जुलै दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे.
उपसंचालक, सार्वजनिक शिक्षण विभाग बेळगाव उपसंचालक, पदवीपूर्व शिक्षण विभाग बेळगाव व उपसंचालक, महिला व बालकल्याण विभाग बेळगाव यांनी या आदेशाचे काटेकोर पालन करून येत्या काही दिवसांत या सुट्टीचा कालावधी समायोजित केला जाईल.