Tuesday , March 3 2026
Breaking News

चारित्र्याच्या संशयावरून मुडलगी तालुक्यात एकाचा निर्घृण खून

Spread the love

 

मुडलगी : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील लक्ष्मीश्वर गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मौलासाब यासीन मोमीन (28) हा आपल्या दुचाकीवरून शिल्पा नामक महिलेला घेऊन जात असताना शिल्पाचा पती अमोघ ढवळेश्वर याने पाहताच संताप अनावर होऊन मौलासाब मोमिन आणि शिल्पा यांच्यावर चाकूने हल्ला करताच मौलासाब याचा जागीच मृत्यू झाला तर शिल्पा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुरगोड पोलीस स्थानक हद्दीत ही घटना घडली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीला पोलीसानी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कुलगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *