बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसची दहशत पुन्हा सुरु झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार बेळगाव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोरूना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सातत्याने प्रवास केला आहे तसेच आरोग्य दक्षतासाठी सातत्याने बैठका घेऊन अधिकार्यांसमवेत चर्चा देखील केली आहे आता ते स्वतः कोरोनाबाधित झाले असल्यामुळे त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे.
