बेळगाव : बेळगाव येथील “वन टच फाऊंडेशनचे” अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा विठ्ठल फर्निचर उद्योजक श्री. विठ्ठल फोंडू पाटील यांच्या ऑटोनगर येथील फर्निचर दुकानच्या गल्लीमध्ये रात्री भली मोठी झाडाची फांदी तुटून पडलेली होती. तेथून या जायला वाहतुकीला रस्ता बंद झाला होता, ते पाहून विठ्ठल फर्निचर मधील काम करणाऱ्या सर्व कामगारांनी एकत्र येऊन, एक, एक बारीक फांद्या कट केल्या अणि त्या रस्त्याकडेला ठेऊन वाहतुकीला रस्ता मोकळा करून सामाजिक बांधिलकी जपली. त्याबद्दल तेथील कारखानदारांनी त्यांची कौतुक करून अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta