राजहंसगड : सध्या सुळगे – येळ्ळूर रस्त्याची अतिशय दयनीय0 अवस्था झाली आहे, रस्त्यावर ठीकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही व अपघात घडत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन डागडूजी करावी अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांतून होत आहे.
माजी आमदार संजय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून येळ्ळूर ते राजहंसगड पर्यंत हा रस्ता करण्यात आला होता, परंतु त्यानंतर या रस्त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सध्या राजहंसगडावर पर्यटक येळ्ळूरमार्गे मोठ्या प्रमाणात येतात तसेच विटा, वाळू वाहतूकही जास्त आहे, रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सुळगे (येळ्ळूर) येथे गटारी बुजल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. मागील दोन तीन वर्षापासून विटा वाहतूक करणारे वाहनधारक तसेच काही समाजसेवकानी स्वखर्चातून खड्डे बजवले होते.