बेळगाव : जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने रविवार दि. २८ रोजी कृतज्ञता दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रीज बेळगांव येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत कार्यक्रम होणार आहे. गुरु पौर्णिमा व वामनराव पै जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केला आहे. विश्व प्रार्थनेने सुरुवात होणार आहे. त्यानंतर संगीत जीवनविद्या, नृत्य, गुरुपूजन, अनुग्रह असे कार्यक्रम होणार आहेत. प्रबोधनकार सुदाम धोत्रे (मुंबई) यांचे स्वरूप ज्ञानाकडे वाटचाल कशी करावी या विषयांवर प्रबोधन होणार आहे. संस्थेतर्फे वर्षभर राबवले जाणारे सामाजिक उपक्रम, संस्कार शिक्षण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, अवयवदान, स्वच्छता अभियान, विद्यार्थी मागदर्शन, कृषी समृद्धी याबाबत माहिती देण्यात येणार आहे.