बैलहोंगल : दारूच्या नशेत मुलाने आईची हत्या केल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली. महादेवी गुरप्पा तोलगी (७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा इराण्णा गुराप्पा तोलगी (वय ३४) याने तिचा दारूच्या नशेत खून केला
त्याच्या नावावर शेती करावी तसेच पैशासाठी तो कायम आपल्या आईला त्रास देत होता. दारूच्या नशेत त्याने त्याची आई महादेवी तेलंगी हीचा काठीने वार करून खून केला.
डीवायएसपी रवी नायक, पीएसआय नंदिश, प्रवीण कोटी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना अटक केली. दोडवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
Belgaum Varta Belgaum Varta