बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे सीमा लढ्यामध्ये योगदान हे उत्तुंग आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ज्या वेळेला महाजन अहवाल लादण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन आंदोलन केले आणि त्यामध्ये 67 शिवसैनिक हुतात्मे झाले आणि महाजन अहवाल गाडला गेला. त्यापूर्वी आणि त्यानंतर सुद्धा प्रत्येक सीमालढ्याच्या आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरे आंदोलनामध्ये सहभागी होऊन नेतृत्व केले आहे, आपल्या अंतिम क्षणापर्यंत ते सीमाप्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहिले आणि म्हणूनच सर्व सीमावासीयांच्या मनामध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1936 साली सेनापती बापट यांच्या सोबत बेळगावला भेट दिली होती आणि स्वातंत्र्य चळवळीचे मार्गदर्शन केले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत बेळगावचे कै. शांताराम अष्टेकर सुद्धा उपस्थित होते. आज त्यांच्या 125 जयंती निमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशभरात अभिवादन करण्यात येत आहे, असे सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविकात सांगितले.
सुरूवातीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सुनील बोकडे, किरण मोदगेकर, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मा. बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. आणि उपस्थित सर्वानी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी वासू सामजी, विनायक कावळे, राजू कदम, साईनाथ शिरोडकर, सौरभ जोशी, अजय सुतार, सौरभ तोंडले, प्रवीण धामणेकर, प्रतीक पाटील, आशिष कोचेरी, अशोक पाटील, श्रीधर पाटील, सुशील मातूंगडे, राम किरमटे आदी उपस्थित होते.
