Friday , December 8 2023
Breaking News

गिनीज बुक रेकॉर्डची जलपरी सई पाटीलचा निपाणीत सत्कार

Spread the love
निपाणी (वार्ता) : मुंबईमधील जलपरी सई अशिष पाटील (वय१०) हिने १४ डिसेंबर २०२१ या दिवसापासून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने प्रवास करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवलेले आहे. त्यामुळे सई पाटीलचा निपाणी येथे प्रथमच भारत बिडी वर्क्सतर्फे रमेश पै यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विजय मेत्राणी यांनी केले.
सईचे वडील आशिष पाटील म्हणाले, सई ही दहा वर्षाची  असून तिच्या नावे अनेक विक्रम नोंदवलेले आहेत. केवळ दहा वर्षाची असणाऱ्या सईने काश्मीरपासून सायकलिंग सुरुवात केली. पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, पनवेल,  पूणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक, निपाणी, तामिळनाडू मदुराई व कन्याकुमारी असा प्रवास ३८ दिवसांमध्ये ३६३९ किलोमीटर यशस्वीरित्या प्रवास पूर्ण केला आहे. कर्नाटकामध्ये प्रवेश केल्यानंतर निपाणीपासून कन्याकुमारीपर्यंत सामाजिक कार्यकर्ते विजय मेत्राणी यांनी  सर्वपरीने सहकार्य आणि व्यवस्थापन केले असल्याचे सांगितले.
 जलपरी सई पाटील म्हणाली, सायकल प्रवास करत असताना सर्वांना एक संदेश द्यावयाचा आहे. सध्या प्रदूषण होत असल्याने प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा, मुली वाचवा मुली शिकवा, प्लास्टिकचा वापर कमी करा, पेट्रोल-डिझेल कमी करून सायकल वापरा, असा संदेश सायकलच्या दरम्यान विविध राज्यांना दिले असल्याचे सांगितले.
सत्कार प्रसंगी अभियंते सुनील बल्लोळ, मुर्गेश कल्याणशेट्टी, सुंदर पाटील, महेश शेनॉय, आनंद संकपाळ, रम्या पै, अश्विनी मैत्राणी, विनोद चोरगे, भूपेंद्र निंबाळकर- सरकार, अभिषेक मेत्रांनी यांच्यासह निपाणी सायकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मावळा ग्रुपची यंदाची मोहीम शिवेनरी गडावर

Spread the love  अध्यक्ष आकाश माने; निपाणी येथे बैठक निपाणी (वार्ता) : प्रतिवर्षी निपाणी तालुक्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *