Sunday , September 20 2026
Breaking News

समाजाच्या गरजा आणि व्यथा यांचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे : पत्रकार उपेंद्र बाजीकर

Spread the love

बेळगाव : अनेक संकटांच्या छायेतून सध्या समाजाची वाटचाल सुरू आहे. दिशाहीन झालेले राजकारण समाजाची फरफट करीत आहे. अशावेळी बदलत्या समाजाच्या गरजा आणि व्यथा यांचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामधूनच अधिक सक्षम पत्रकारिता करता येईल, असे विचार स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी व्यक्त केले. बेडकीहाळ येथील कै. बी. एन. शिंगाडे ट्रस्टच्यावतीने शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात उपेंद्र बाजीकर यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव सोहळ्यांतर्गत बाळशास्त्री जांभेकर पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उपेंद्र बाजीकर यांनी पत्रकारांच्या समोरील प्रश्नांचा आढावा घेतला. तसेच कष्टप्रद काळामध्ये समाजाची अधोगती होत असताना पत्रकारांनी समाजहिताचे भान ठेवून कार्यरत राहणे ही कसोटी असल्याचे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हावेरी येथील जानपद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एम. साली होते. तसेच कोल्हापूर येथील व्याख्याते प्रकाश कदम हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *