बेळगाव (वार्ता) : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे दिनांक 24 ते 28 जानेवारी हे पाच दिवस भगवतगीता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे.
इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे होणार्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय आहे? सुखाचा शोध व मनुष्य जीवनाचे महत्व, भगवान कोण आहेत? मी कोण आहे? आत्मा काय आहे? पुनर्जन्म ही एक कल्पना आहे की वास्तविकता? याच बरोबर चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते? सर्वोत्तम योग कोणता? आणि व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचे उपयोग काय? या विषयावर या पाच दिवसात मार्गदर्शन केले जाणार आहे.
रोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत होणार्या या अभ्यासवर्गात प्रवचन, लाईव्ह शो, व्हिडिओ, प्रश्न उत्तर बरोबरच महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
भाविकांनी याचा लाभ घ्यावा त्यासाठी 9901847044 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …