संकेश्वर (वार्ता) : आज दिनांक 21 जानेवारी 2022 महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत संकेश्वर येथील सरकारी मराठी मुलांची शाळा आणि सरकारी मुलींच्या प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते त्याअंतर्गत आज संकेश्वर येथील दोन्ही मराठी प्राथमिक शाळेमध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.
ह्या उपक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक अंबुळकर मॅडम आणि कुलकर्णी मॅडम तसेच शिक्षक वृंदातील सौ. शिरगावे मॅडम, एस. आर. सनदी सर, बी. बी. पाटील मॅडम आणि सौ. एस. ए. तावदारे मॅडम आदी उपस्थित होते.
Check Also
घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू
Spread the love हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …