Thursday , September 19 2024
Breaking News

बाप्पाच्या आगमनाची चाहूल, बेळगावच्या राजाचे मुहूर्तमेंढ मोठ्या दिमाखात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : नवसाला पावणारा राजा अशी ख्यात असलेल्या बेळगावच्या राजाचे आज 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गणेश मंडप मुहूर्तमेंढ संपन्न झाले.

बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बेळगावच्या राजाचे गणेश मंडप मुहूर्तमेंढ पूजन रविवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, माजी आमदार अनिल बेनके व कार्याध्यक्ष सुनील जाधव यांच्या शुभहस्ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्लीत पार पडले. यावेळी मराठा बँकचे चेअरमन दिगंबर पवार यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.
प्रारंभी सनई व ढोलताशांच्या गजरात चव्हाट गल्ली येथील जागृत देवस्थान चव्हाटा मंदिर, देवदादा सासनकठी जोतिबा मंदिर, गणेश मंदिर, मारुती मंदिर येथे मंडळकडून विधिपूर्वक पूजन करून आरती करण्यात येतं तेथून पारंपरिक पद्धतीने भटजीकडून गणेश मंडप खांब मुहूर्तमेंढ पूजन करण्यात आले.

हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा 2024 मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या मध्यात आपल्या घरी येतील. 7 सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होईल तर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा बाप्पाचे आगमन 15 दिवस आदी होणार आहे.

जवळपास चार आठवड्यावर असलेला बेळगावातील सर्वात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा गणेश उत्सवाची तयारी आतापासूनच सुरु झाली असून बेळगावचा राजा चवाट गल्ली येथील मंडळांनी आपापल्या उपक्रमांना सुरुवात केली आहे. यावेळी गल्लीतील मोठ्या संख्येने पंच,महिला, युवावर्ग, उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *