बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने वाचनकट्टा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जेष्ठ शिक्षक व निवेदक श्री. बी. बी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुस्तकांची ओळख व्हावी. पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी परीक्षण करावे यासाठी हा वाचनकट्टा उपक्रम घेतला जाणार आहे. या पहिल्या वाचन कट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संवादांचे सादरीकरण कसे करावे याविषयी माहिती दिली. यामध्ये शिक्षिका मुक्ता कलखांकर, स्नेहल पोटे व विद्यार्थी प्रथमेश चांदिलकर, प्रसाद मोळेराखी, ऐश्वर्या कंग्राळकर, यश गुगरट्टी व रघुवीर देसाई या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी बेळगाव परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. श्री. बी. बी. शिंदे सर यांनी या उपक्रमा मागचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री. इंद्रजीत मोरे, प्रसाद सावंत, हर्षदा सुंठणकर, धीरज सिंहराजपूत, बाळकृष्ण मनवाडकर यांनी परिश्रम घेतले.