बेळगाव : पंचमसाली लिंगायत आरक्षण लढ्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बेळगावात पंचमसाली लिंगायत अधिवक्ता महापरिषद घेणार असून बेळगाव अधिवेशनात संघर्षाबाबत निर्णय घेणार असल्याचे श्रीजयमृत्युंजय यांनी सांगितले.
बेळगाव येथील जिल्हास्तरीय वकिलांची गुरुवारी रात्री एका खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही लिंगायत पोटजातींना ओबीसी आरक्षणासाठी प्रचार करत आहोत. आंदोलनाला जे यश मिळायला हवे होते ते मिळाले नाही. बंगळुरू येथे झालेल्या अधिवेशनात आम्ही आमच्या समाजाच्या आमदारांच्या दारात जाऊन विधानसभेत आवाज उठवण्याचे आवाहन केले. मात्र अधिवेशनात कोणीही आवाज उठवला नाही. याचा परिणाम आपल्या संपूर्ण समाजावर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आमच्या लढ्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बेळगावात लिंगायत वकिलांची परिषद व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय वकिलांची बैठक बोलावण्यात आली आहे. उत्तर कर्नाटक लिंगायत पंचमसाली वकिलांची महापरिषद 15 सप्टेंबर रोजी बेळगावात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या बैठकीत राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta