Monday , December 23 2024
Breaking News

बेळगाव तालुका पोल्ट्री फार्म असोसिएशनची स्थापना

Spread the love

 

बेळगाव : पोल्ट्री व्यवसाय हा शेतीशी निगडित असून अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना या व्यवसायाचा मोठा आधार मिळाला आहे. अलीकडच्या तिन्ही ऋतूपैकी एका काळात तरी शेतकऱ्यांना शेती नुकसानीचा फटका बसत असतोच. अशावेळी अलीकडेच उदयाला आलेल्या पोल्ट्री व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले आहे, त्यामुळे या व्यवसायाचा विस्तार वाढत चालला आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब असून, सरकारकडून या व्यवसायासाठी मिळणाऱ्या योजना मिळवून देण्यासाठी मी खासदार म्हणून कायमच कटिबद्ध असल्याची ग्वाही खा. जगदीश शेट्टर तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी दिली.

बेळगाव तालुका पोल्ट्री फार्म नुकतीच स्थापना करण्यात आली. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव तालुका पोल्ट्री फार्मचे अध्यक्ष ब्रम्हानंद गवस होते. उपखजिनदार भाऊ पाटील यांनी स्वागत केले.
व्यासपीठावर माजी विधानसभा परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ, मुंबई माथाडी कामगार संघटनेचे
अध्यक्ष शिवाजी पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, क्वालिटी अनिमल फिड्सचे डायरेक्टर एस. एस. देशपांडे, हिरण्यकेशी डायरेक्टर पी. एम. देशपांडे, बेळगाव सगुणा मॅनेजर आजया एम, आयबी मॅनेजर विठ्ठल खंडोजी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हनुरकर, एम. एन. पोल्ट्री डायरेक्टर नागेश पारवाडकर, जिल्हा ग्रामीण हेस्कॉम अधिकारी प्रवीणकुमार चिक्काडे, क्वालिटी फिड्सचे अध्यक्ष डॉ. मधुकर पवार, खानापूर तालुका पोल्ट्री आसो. अध्यक्ष जी. ए. गंगाधर, चंदगड तालुका पोल्ट्री असो. अध्यक्ष जयवंत पाटील, चंदगड तालुका पोल्ट्री असो. उपाध्यक्ष शिवाजी पाटील, एस. एन पोल्ट्रीचें डॉ. मनोज पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून खानापूर तालुका पोल्ट्री असो. उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सामाजिक आदर्श पुरस्कार विजेते एन. के. नलवडे यांचा असो.तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी क्वालिटी डॉ. मधुकर पवार यांनी बोलताना सांगितले की, असोसिएशन स्थापनेमागचा उद्देश चांगला आहे, पण, प्रत्येक मालकांकडून औषधांसह फिड्स व्यवस्थापन उत्तम हवे, ते ठेवण्यासाठी कंपनीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. क्वालिटी कंपनी कायमच तळागळातील व्यवसायाशी कायमच सलग्न आहे. संघटनेमध्ये कायदेशीरसह सर्वच बाबतीत एकीचे बळ मिळते. त्यामुळे तुमचा पाठिंबा कंपनीला कायम हवा आहे, कारण कंपनी मोठी झाली तर व्यवसायिकही मोठा होणार आहे.

यावेळी खानापूर असो. उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांनी व्यावसायिकांनी कसे व्यवस्थापन केले पाहिजे शिवाय संघटनात्मक बांधणी कशी ठेवली पाहिजे याबाबत माहिती दिली. पोल्ट्री व्यवसाय सुरू करणे मोठे नाही तर तो टिकवणे फार जिकीरीचे आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आदेशानूसार हा व्यवसाय चालवावा लागतो. याची सर्वांनी जाणीव ठेवणे आवश्यक असल्याच्या सांगताना, संघटना स्थापनेच्या शुभेछा दिल्या. यावेळी नूतन असो. चे पदाधिकारी, पोल्ट्री व्यवसायीक उपस्थित होते. बेळगांव असो.चे उपाध्यक्ष परशराम पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *