बेळगाव: येथील जिल्हा स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघ यांच्यावतीने 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शतायुषी स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमात विवेकानंद पोटे, किरण बेकवाड यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. दिलीप सोहनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी प्रकाश अष्टेकर, शंकर गिरी, हलगेकर आणि संस्थेचे अनेक सभासद उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
