बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे नुकतीच पार पडली संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
दि. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेने सुमारे २० कोटी २१ लाख रुपयांच्या ठेवी १५५. ०२ कोटी रुपयांचे खेळते भांडवल व ३२,१८,१३४. ६४ रुपये इतक्या विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. तसेच सभासदांना ८% लाभांश देण्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.
संस्थेच्या आर्थिक कामकाजा बरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उपक्रम राबवून गेली १५ वर्षे एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहे. यंदा या उपक्रमाअंतर्गत संस्थेने अखिल भारतीय स्तरावर एकांकिका बाल्य नाट्य लेखन स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले, भविष्यात संस्थेच्या उलाढालीमध्ये वाढ करण्यासाठी कर्जदारांना कमीत कमी व्याजदरात कर्जपुरवठा तर ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याजदर देण्याचा संस्था प्रयास करीत आहे.
संस्थेच्या प्रभारी समन्वयक स्नेहल कंग्राळकर यांनी अहवालाचे वाचन व सभेपुढील विषय वाचले. यावेळी प्रत्येक विषय व अहवालावर सविस्तर विवेचन श्री. हंडे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शाम सुतार सर्वश्री रामकुमार जोशी, शिवाजीराव अतीवाडकर, सदानंद पाटील, शरद पाटील, संजय चौगुले, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी पिग्मी संकलकांनी सभेच्या आयोजनामध्ये विशेष योगदान दिले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्याम सुतार यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta