Wednesday , March 4 2026
Breaking News

रामदेव गल्ली वडगाव येथे मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : रामदेव गल्ली, माधवपूर -वडगाव येथे श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केल्या जाणाऱ्या श्री हनुमान, श्री नागदेवता, श्री शिवलिंग व नंदी या मूर्तींची स्वाद्य मिरवणूक बुधवारी वडगाव परिसरात काढण्यात आली. वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत अनेक पुरुष व मंगल कलश घेऊन सुहासिनी महिला सहभागी झाल्या होत्या. वाटेत अनेकांनी मूर्तींवर पुष्प वृष्टी केली. त्या सर्व मूर्ती आणून मंदिर परिसरात ठेवण्यात आल्या.
आज गुरुवारी नव्या मंदिराची वास्तुशांती, विधिवत हवन वगैरे कार्यक्रम संपन्न झाले.
हरीष तेरगावकर यांच्या हस्ते उद्या मूर्तींची प्रतिष्ठापना व कळसारोहन होणार आहे. आज सुहासिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उद्याही भाविकांनी उपस्थित रहावे तसेच वस्तू अथवा रोख रक्कम देणगी स्वरूपात द्यायची असेल तरी कमिटीला संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष गोपाळराव सूर्यवंशी व सेक्रेटरी विजय बनसुर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *