बेळगाव (वार्ता) : पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी ध्वजारोहण जी. व्ही. कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते झाले. फोटो पूजन विश्वभारत सेवा समितीचे सेक्रेटरी प्रकाश नंदिहळ्ळी, प्राचार्या ममता पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले, त्याचप्रमाणे देशभक्तीपर गीते सुद्धा गायिली. प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजच्या हिंदी विषयाच्या अध्यापिका जी. व्ही. कुलकर्णी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले विचार मांडले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कॉलेजचे अध्यापक वाय. टी. मुचंडी सर, जी. जी. होसुर मॅडम, रेणुका चलवेटकर मॅडम, धनश्री घडे मॅडम, सूरज हत्तलगे सर व अमोल देसाई सर तसेच कॉलेजचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अध्यापक मयूर नागेनहट्टी यांनी केले. व ध्वजवंदन वंदे मातरम आणि आभार प्रदर्शन के. एल. शिंदे सर यांनी केले.
