Thursday , March 5 2026
Breaking News

हत्तरगी येथील श्री हरी काका गोसावी मठात दिनांक 26, 27, 28 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी विविध कार्यक्रम

Spread the love

 

डॉ. आनंद महाराज गोसावी यांची माहिती

बेळगाव : हत्तरगी (ता. जि. बेळगाव ) येथील पुरातन श्री हरी काका गोसावी भागवत मठाचे वतीने दिनांक 26, 27, 28 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सवाची तयारी झाली आहे. यानिमित्ताने विविध आध्यात्मिक, संगीत सेवा यासह गोपाळ काला कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मठाचे उत्तराधिकारी डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाला बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खा. प्रियंका जारकीहोळी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, यांच्यासह कन्नड संस्कृती विभागाचे सहायक संचालक श्रीमती विद्या ती बजत्रि आदी उपस्थित राहणार आहेत.

दिनांक 26 रोजी सकाळी 11 वा प्रति वर्षी प्रमाणे भव्य आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रात्री 10 वा सौ. स्वरदा पटवर्धन हरिदास (सांगली) यांचे श्री कृष्ण जन्म काळ व कीर्तन होईल. 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वा श्रुती मराठे विश्वकर्मा (मुंबई) यांचे भक्तीगीत गायन आणि मानसा ग्रामपुरोहित (हुबळी) यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. 28 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता गोपाळ काला आणि महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी केले आहे. कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
पुरातन श्री हरी काका गोसावी भागवत मठात पारंपरिक पद्धतीने गोकुळ अष्टमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या वर्षी होणार्‍या गोकुळ अष्टमी उत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *