बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा मंडळ येथे जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार उपस्थित राहणार आहेत.
कै. अर्जुनराव घोरपडे यांनी बेळगाव सहकार क्षेत्राला एक नवीन दिशा दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून कै. अर्जुनराव घोरपडे यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष, माजी अर्थमंत्री व आमदार जयंत पाटील, निवृत्त सहकार व पणन अधिकारी दिनेश ओऊळकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील हे असणार आहेत. यावेळी मराठा मंदिर नूतनीकरणाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला समस्त बेळगाववासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समितीतर्फे करण्यात आले आहे.
Check Also
सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी अनंत लाड यांची निवड तर उपाध्यक्षपदी डॉ. विनोद गायकवाड
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या अध्यक्षपदी …