Saturday , March 7 2026
Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर कारची रिक्षाला धडक : एक ठार

Spread the love

 

बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात ऑटोतील प्रवासी ठार आणि चालक जखमी झाल्याची घटना काल मध्यरात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर घडली.

अपघातात ऑटोरिक्षा मधील ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशाचे नांव मीरा साब (वय 30, रा. गुजरात) असे आहे. अपघातग्रस्त कारचा चालक हुबळीचा एक विद्यार्थी असल्याचे समजते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर काल गुरुवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास नियंत्रण सुटलेली भरधाव कार ऑटो रिक्षाला जोराची धडक देण्याबरोबरच रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन आदळली. परिणामी ऑटो रिक्षातील प्रवासी ठार आणि रिक्षा चालक जखमी होण्याबरोबरच कार गाडीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. जखमी ऑटो रिक्षा चालकाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून याप्रकरणी उतर रहदारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *