बेळगाव : बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री एम. बी. पाटील यांनी येथील काँग्रेस कार्यालयाच्या भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना स्टार्टअप्स आणि प्रादेशिक विकासावर लक्ष केंद्रित करून बेळगाव शहरासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
यावेळी बोलताना मंत्री एम. बी. पाटील यांनी, बेळगावसाठी 100 एकर जागेत स्टार्टअप पार्कची योजना आहे. बेळगावात स्टार्टअप पार्क विकसित झाल्यावर स्थानिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वाव मिळणार आहे. अशा पार्कची बेळगावात गरज आहे यावर त्यांनी भर दिला.
मंत्री पाटील यांनी, हुबळी-धारवाड-बेळगाव कॉरिडॉरच्या आगामी विस्ताराचाही उल्लेख केला, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल.या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta