बेळगाव : गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर अधिकाऱ्यांनी बेळगावातील गणेश मिरवणूक मार्ग व गणेश विसर्जनाच्या तलावांची पाहणी करून अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या.
बेळगावात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज विविध विभागांची बैठक बोलावली. बैठकीनंतर त्यांनी बेळगावातील मारुती गल्ली, रामदेव गल्ली, खडेबाजार, समादेवीगल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी सर्कल, कपिलेश्वर आदी ठिकाणच्या गणेश विसर्जन मार्गांची पाहणी केली. शहरातील गणेश विसर्जन तलाव जसे की, कपिलेश्वरचा जुना टाळावा, जक्कीन होंड यासह नवीन तलावाची पाहणी करून मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या सूचनेनुसार विसर्जनासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, पोलीस आयुक्त याडा मार्टिन आदी अधिकारी सहभागी झाले होते.