बेळगाव : रेणुकास्वामी हत्येचा A-2 आरोपी दर्शनला जशी परप्पन कारागृहात सिगारेट देण्यात आली त्याप्रमाणे आम्हाला देखील सिगारेट द्या, अशी मागणी हिंडलगा कारागृहातील कैद्यांनी रविवारी तुरुंगात निदर्शने केली.
हिंडलगा कारागृहात कैद्यांनी बिडी आणि सिगारेट तंबाखूसाठी निदर्शने केली आहेत. बिडी, सिगारेट देईपर्यंत आम्ही नाश्ता करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
डोकेदुखी ठरलेल्या कैद्यांच्या मागण्या कारागृह प्रशासनाला पूर्ण करता येत नसल्याने तुरुंग कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
बिडी सिगारेट न दिल्यास दुपारचे जेवण देखील घेणार नाही, असा इशारा देखील कैद्यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta