
कावळेवाडी (बेळगाव) : पुस्तके वाचा, लिहा लेखनातून व्यक्त होता येत. पुस्तके दिशा देण्याचे काम करतात अपयशातून खचून न जाता सातत्याने प्रयत्न करावा, यश नक्कीच मिळते अशा स्पर्धांतून प्रोत्साहन मिळते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. या स्पर्धेतून धीटपणा येतो बोलण्याची संधी मिळते चांगले वक्ते घडावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी आयोजित वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. प्राथमिक शाळा बिजगर्णी येथे घेण्यात आल्या.
अध्यक्षस्थानी पत्रकार शिवाजी शिंदे उपस्थित होते.
प्रारंभी वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या सहकार्याने असे उपक्रम राबविणे शक्य झाले आहे सरस्वती फोटो पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. निलेश पारकर कणकवली, संतोष कांबळे, डॉ. परशराम हुंद्रे, लक्ष्मण जाधव, के. आर. भास्कर, उपाध्यक्ष ऍड. नामदेव मोरे यांच्या शुभहस्ते
या स्पर्धा पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आल्या.
पहिल्या पाच क्रमांकाना रोख रक्कम, सन्मान चिन्ह गौरव पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
निकाल : आठवी ते दहावी, प्रथम क्रमांक प्राजक्ता परशराम पाटील (बेळगुंदी मुलींचे हाय.), २) निकिता सुबराव अष्टेकर (बिजगर्णी हाय.), ३) सई शिवाजी शिंदे (कुद्रेमणी हाय.), ४) नम्रता लक्ष्मण सुतार (बिजगर्णी), ५) श्रीराम कल्लापा भास्कर (बिजगर्णी).
पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक कु.साईतेज सिद्धलिंग सारंगी (मराठा मंडळ खादरवाडी), २) समृद्धी परशराम पाटील (बेनकनहळी), ३) वैभवी विकास मोरे (राकसकोप, बालवीर), ४) संकल्प मारुती टक्केकर (बेनकनहळी), ५) वैष्णवी रवळू जाधव (बिजगर्णी प्राथमिक शाळा)
चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी ऍड. नामदेव मोरे यांनी मौलिक विचार व्यक्त करुन मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर मनोहर बेळगावकर, वाय पी नाईक, निलेश पारकर, रेखा नाईक, ऍड. नामदेव मोरे, संतोष कांबळे, डॉ. परशराम हुंद्रे, लक्ष्मण जाधव, सागर नाईक, दौलत कणबरकर, के आर भास्कर एम पी मोरे, शशिकांत गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धांचे परीक्षक म्हणून कोमल पांडुरंग गावडे, ऍड. नामदेव नारायण मोरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन मनोहर मोरे, आभार प्रदर्शन तेजस्विनी कांबळे यांनी केले.
या स्पर्धेसाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta