बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले ज्येष्ठ नेते स्व. श्रीपतराव शिंदे साहेब यांची कन्या स्वातीताई कोरी यांच्या निर्धार सभेला उपस्थित राहून पाठिंबा दिला. 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात झालेल्या सत्याग्रहात 151 सत्याग्रहींच्या तुकडीतील ते प्रमुख नेते होते. त्यांचा वारसा खंबीरपणे चालवणाऱ्या स्वातीताई कोरी यंदा विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत. शिंदे साहेबांप्रमाणेच त्यांची ह्या प्रश्नांविषयी प्रचंड आस्था आहे. त्यांना जर संधी मिळाली तर नक्कीच सीमाप्रश्नी त्या आवाज उठवतील, अशी भावना व्यक्त केली.
प्रसंगी माझे सहकारी मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta