बेळगाव : शहापूर येथील सरकारी सरस्वती गर्ल्स हायस्कूल या भागातील मुलींच्या शिक्षणासाठी नावाजलेल्या हायस्कूल होते.मात्र शाळेची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने या ठिकाणी सुसज्ज असे पदवीपूर्व महाविद्यालय बांधण्यात येत आहे. खास मुलींसाठी स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालय सुरू करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पूर्ण होण्याची शक्यता आहे. दक्षिण मतदार संघातील शहापूर येथील सरकारी सरस्वती पदवीपूर्व महाविद्यालय निर्माणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तर येत्या जून महिन्यापर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे.अशी माहिती दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली आहे. या कामासाठी एक कोटी 25 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच येथील काम पूर्ण करण्याकरिता तीन कोटी 25 लाख रुपये अनुदानातून याठिकाणी सुसज्ज आणि सर्व सोयींनीयुक्त मुलींसाठी स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालय सुरू होणार आहे. या ठिकाणी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
Check Also
ममता चिठ्ठीचे मरणोत्तर देहदान
Spread the love जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार बेळगाव : मूळच्या येळ्ळूर आणि सध्या समृद्धी कॉलनी …