बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईडतर्फे सेंट पॉल्सच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निशा छाब्रिया स्मृती चषक प्रदर्शनीय मुलींच्या फुटबॉल सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने संत मीरा हायस्कूल संघावर ५-० असा एकतर्फीय विजय संपादन केला. या स्पर्धेचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते फुटबॉल चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने पूर्वार्धात संत मीरा हायस्कूल संघावर आक्रमक चाली रचून २-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखीन ३-० गोल नोंदवून ५-० अशी निर्विवाद आघाडी घेतली. शेवटी सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने हा सामना एकतर्फे जिंकला. सेंट झेवियर्स संघाची कर्णधार वसुंधरा चव्हाण हिने (३) तर श्रावणी सुतार हिने (२) यांनी गोल नोंदविले.प्रदर्शनीय सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे नागेश छाब्रिया, सुमुख छाब्रिया, रिद्धी छाब्रिया, फादर सायमन फर्नांडिस यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरव करण्यात आला. सेंट झेवियर्स हायस्कूल संघाला फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट, मानस नायक, योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.