शहरातील बसवान गल्ली येथील मxxxठा बँकेच्या अध्यक्षांनी आपल्या भ्रष्टाचाराचे कारनामे लपविण्याकरिता तसेच भविष्यात बँकेवर आपला सुलतानी कारभार चालविण्याकरिता आपल्या नात्या-गोत्यातील व बँकेची तीळमात्र व्यवहार नसलेल्या लोकांना सभासद करून घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर कोणत्याही संचालकांना ही बाब समजू शकली नाही काय?
“त्या” बँकेचे ‘अ’ वर्ग सभासद संख्या 12808 इतकी आहे. पण वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल मात्र आपल्या मर्जीतल्या सभासदांना मिळतो. ज्यावेळेस काही ज्येष्ठ व जुने सभासद अहवाल न मिळाल्याची तक्रार करतात त्यावेळेसही अध्यक्ष महाशय “त्या” सभासदांच्या तक्रारींचे निवारण न करता उलट त्यांना खोट्या तक्रारीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांचे शेअर बरखास्त व्हावेत.
अशा दिग्गुभाईला वेळीच आवर घालणे व बँकेला वाचविणे ही काळाची गरज आहे. “बेळगाव वार्ता”कडे “त्या” बँकेच्या गैरकारभाराबद्दल अनेक पुरावे व असंख्य तक्रारी आहेत. तेव्हा आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जागृत सभासदांनी अशा तनाशहा अध्यक्षांवर योग्य क्रम घेऊन बडतर्फ करावे अशी विनंती “त्या” बँकेच्या हितचिंतकांनी केली. दरम्यान आजच्या वार्षिक सर्व साधारण सभेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.