बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलची विद्यार्थिनी अक्षरा गुरव हिने 49 किलो ग्रॅम वजन गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला निवड झाली आहे. तसेच वेदांत कुगजी याने तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष वाय. एन. मजूकर, सचिव प्रसाद मजुकर, मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, शारीरिक शिक्षक एम. एम. डोंबले व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावांमध्ये कौतुक होत आहे.