बेळगाव : मॉर्निंग वॉकला गेलेल्या पादचाऱ्याला बोलेरोची धडक बसून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील महात्मा फुले रोड येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. श्रीधर पवार (वय 42) रा. संतसेना रोड बेळगाव असे या मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीधर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायला गेले होते. रस्ता ओलांडण्यासाठी ते दुभाजकाजवळ थांबले होते. त्यावेळी गोवावेसकडून बँक ऑफ इंडियाकडे महात्मा फुले रोडवरून जाणाऱ्या बोलेरो गाडीने दुभाजकाला आणि रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या श्रीधर यांना जोराची धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला.
दक्षिण विभाग रहदारी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
मयत श्रीधर हे इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta