Wednesday , March 4 2026
Breaking News

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 21 गुंठे जागा मूळ मालकाला सुपूर्द

Spread the love

 

बेळगाव : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 21 गुंठे जागा मूळ मालक बाळासाहेब टी. पाटील यांना महापालिका, स्मार्ट सिटी प्रांताधिकारी यांनी सन्मानपूर्वक सुपूर्द केली. सकाळी नऊ वाजता संबंधित रस्त्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला.

जागा गमावलेल्यांना त्याच रस्त्यावर जागा देण्याची प्रक्रिया शनिवारी बेळगाव महापालिकेकडून करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारच्या आत जमीन विस्थापितांना देण्यात यावी. तसे न केल्यास 20 कोटी रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज सदर जागा संबंधित मालकाला सुपूर्द करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *