Monday , December 8 2025
Breaking News

आडमार्गाने कर्नाटक हद्दीत प्रवेश करू पाहणाऱ्या दोन खाजगी बसेसवर कारवाई

Spread the love

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी चेकपोस्ट नाक्यावर कोरोना निगेटिव्ह चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांनाच कर्नाटक हद्दीत प्रवेश दिला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सीमावर्ती चेकपोस्टच्या ठिकाणी कडक तपासणी करण्यात येत आहे, तथापि काही वाहनचालक ही तपासणी चुकविण्यासाठी आडमार्गाने कर्नाटक राज्यात प्रवेश करत आहेत. असाच प्रयत्न करणाऱ्या दोन खाजगी बस गाड्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, मुंबईहून बेंगलोरला निघालेली शर्मा ट्रान्सपोर्ट गाडी नंबर केए 51 एडी 0277 या खाजगी बसमध्ये 28 प्रवासी प्रवास करीत होते, मात्र 28 प्रवाश्यांपैकी 24 प्रवासी हे आरटीपीसीआर प्रमाणपत्राशिवाय प्रवास करीत होते. त्याचप्रमाणे नॅशनल ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक नंबर केए51 ए एफ 6652 ही बस देखिल मुंबईहून बेंगलोरकडे निघाली होती मात्र या बसमधील 28 प्रवाश्यांपैकी 17 प्रवासी आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय प्रवास करीत होते.
दोन्ही बस या बेंगलोरकडे निघाल्या होत्या मात्र निपाणी जवळील कोगनोळी चेकपोस्ट चुकवून या बस कागल, शेंदूर, आप्पाचीवाडी मार्गे परस्पर राष्ट्रीय महामार्ग गाठण्याचा पप्रयत्नात होत्या. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला, असे पोलिसांनी सांगितले.
चेकपोस्ट तपासणी चुकवून कर्नाटक राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही खाजगी वाहन चालकांवर, मालकांवर आणि प्रवाश्यांवर देखील निपाणी पोलिस स्थानकात कर्नाटक संसर्गजन्य रोग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *